Wednesday, 25 March 2026

सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी राज्यात प्रगत सायबर सुरक्षा प्रकल्प

 सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी राज्यात प्रगत सायबर सुरक्षा प्रकल्प

- गृहराज्यमंत्री योगेश कदम

 

मुंबईदि. २४ : राज्य सरकारने सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबविला आहे. आशिया खंडात अशा प्रकारचा प्रगत सायबर सुरक्षा प्रकल्प राबविणारे महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्य आहे. या अंतर्गत अत्याधुनिक साधने (टूल्स) आणि पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेतअशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील आर्थिक सायबर गुन्ह्यासंदर्भात सदस्य विकास ठाकरे यांनी अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. त्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi