दुग्ध संकलन केंद्राच्या वीजदरात मोठी कपात; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.१० : राज्यातील दुग्ध संकलन केंद्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या 'चिलर्स'च्या वीजदरात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी) नव्या आदेशानुसार, हे सुधारित दर १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले.
राज्य वीज नियामक आयोगाने दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबत आमदार अनिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
No comments:
Post a Comment