ज्या विद्यापीठांचे उपक्रम यशस्वी ठरतील त्या विद्यापीठांचे उपक्रम इतर विद्यापीठांमध्ये राबवले जातील असे देखील राज्यपालांनी सांगितले. आपण लवकरच सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंशी चर्चा करू असेही राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यापीठांतर्फे सुरु असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठांचे राष्ट्रीय मानांकन, महिला सक्षमीकरण, स्वयंसिद्धा उपक्रम, कौशल्य विकास, 'स्कूल कनेक्ट' कार्यक्रम, आदी विषयी माहिती दिली.
No comments:
Post a Comment