Saturday, 7 March 2026

सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडणारा असून राज्याच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांना चालना देणारा

 सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप असलेला राज्याचा अर्थसंकल्प

-          मंत्री अतुल सावे

मुंबईदि.६ : राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडणारा असून राज्याच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांना चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.

मंत्री अतुल सावे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प प्रगतीशीलशाश्वतसर्वसमावेशक आणि सुशासित या चार स्तंभांवर आधारित असून शेतीउद्योगसामाजिक न्यायशिक्षणआरोग्यपायाभूत सुविधातंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्पातून हरित ऊर्जेला चालना देणारे निर्णयही घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आणि मागेल त्याला सौर कृषीपंप योजना यांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होण्याबरोबरच स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जेचा आधार मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र हरित ऊर्जेच्या दिशेने मोठी पावले टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi