सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित
महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल
-सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
· देशातील पहिल्या सर्वेक्षण योजनेतून 15 हजार युवकांना प्रशिक्षण आणि पाच हजार रोजगारनिर्मितीचा संकल्प
मुंबई, दि. 2 : युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत 2047’ हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा पायाभूत टप्पा आहे. शासनाच्या या संकल्पनेमध्ये युवकांच्या क्षमतेचा कल जाणून घेणारी ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजना देशातील अशी पहिलीच सर्वेक्षण योजना असून रोजगार निर्मितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याने महत्वाचे उचललेले पाऊल राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment