किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
· प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित
· मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी
· महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटींचे वितरण
मुंबई, दि. १३ : सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत आणि इतर शेतीसंबंधित खर्च भागविण्यास मदत होत आहे असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले
गुवाहाटी येथील समारंभात "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी" चा २२ वा हप्त्याचे डीबीटी हस्तांतरण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
या कार्यक्रमाद्वारे देशभरातील सुमारे ९.३२ कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १८,६४० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट डीबीटी पद्धतीने जमा करण्यात आली. प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात २,००० रुपयांचा हप्ता जमा झाला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४.२७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे. दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबांना ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.
या २२ व्या हप्त्यात २.१५ कोटीहून अधिक महिला शेतकरी लाभार्थ्यांनाही आर्थिक मदत मिळाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी आसाममधील गुवाहाटी कोकराझार येथे पंतप्रधानांच्या हस्ते १९,४८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली
No comments:
Post a Comment