वन्यप्राणी–मानव संघर्ष रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
-वन मंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. 11 : वाघ व बिबट्यांचे हल्ले, वन्यप्राणी–मानव संघर्ष आणि वनसंवर्धनाच्या उपाययोजनांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा सदस्यांनी वन विभागासंदर्भातील उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, राज्यात वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण, त्यांचे संरक्षण आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी सॅटेलाईट व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी वन विभागाला जमीनीच्या बदल्यात मिळणारा निधी, ‘एमडीएस’मधून उभारण्यात येणारे कर्ज आणि इतर स्रोतांद्वारे मिळून सुमारे 14 हजार कोटी रुपये उपलब्ध होतील.
No comments:
Post a Comment