Tuesday, 17 March 2026

सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं घर

 सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं घर

-      उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्याचा दिवस आहे. बीडीडीमध्ये राहणारे आता टॉवर मध्ये राहणार. किती तरी वर्षाची त्यांची स्वप्नपूर्ती पूर्ण होत आहे. या चाळीमध्ये पिढ्यान् पिढ्याचा स्वतःचा लढाअनुभव,  भावनिकसांस्कृतिक ऋणानुबंध बांधले गेले आहेत. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं घरसुख-सुविधा मिळाले पाहिजे असे शासनाचे धोरण आहे. १९ तारखेला गुढी उभारण्याचा आनंद येथील रहिवाशांना मिळणार आहे. पोलीस उन्हातानात आपली कर्तव्य बजावत असतात त्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बीडीडी मधील रहिवाशांचा १२ वर्षाचा मालमत्ता कर म्हाडा भरणार आहे. बाहेर फेकला गेलेला मुंबईकर मुंबईत परत आणण्याचे काम अशा प्रकल्पाच्या माध्यमातून हे राज्य शासन करत आहे. क्लस्टरएसआरए सारख्या योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना घरे मिळत आहेत. गृहनिर्माण क्षेत्रासाठी शासनाने क्रांतिकारी निर्णय घेतला असून गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून ७० कोटींची गुंतवणूक व तीस लाख लोकांना पर्यावरण पूरक घरे उपलब्ध होणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi