Tuesday, 17 March 2026

राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

 राजू बाविस्कर यांच्या काळ्यानिळ्या रेषाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, दि.१६ मार्च : साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या  पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून मराठी भाषेतील काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना  पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त राष्ट्रीय संस्था असून भारतीय भाषांमधील साहित्याच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. दरवर्षी अकादमीकडून विविध भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करून त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण ठरलेल्या काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेत लेखकाने आपल्या आयुष्यातील अनुभवसामाजिक वास्तवसंघर्ष आणि वैचारिक प्रवास यांचे प्रभावी चित्रण केले आहे. या साहित्यकृतीला मिळालेल्या  पुरस्कारामुळे मराठी साहित्यविश्वाचा गौरव वाढला आहे.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये काव्यसंग्रहकादंबरीकथासंग्रहनिबंधसाहित्यिक समीक्षाआत्मकथा आणि संस्मरण अशा विविध साहित्य प्रकारांतील विविध पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. देशातील विविध भाषांमधील साहित्यिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या साहित्यकृतींना तज्ज्ञांच्या समितीद्वारे निवडण्यात आले आहे. मराठी भाषेच्या पुरस्कारासाठी नियुक्त परीक्षक मंडळामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोलेनागोराव तम्माजी उटकर आणि राजन गवस यांचा समावेश होता.

साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये मानचिन्हशाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. २०२५ च्या साहित्य अकादमी पुरस्कारांचे वितरण ३१ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi