मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे नुकसानीची तीव्रता लक्षात येत आहे. अशा प्रकारच्या नुकसानीच्या परिस्थितीत यापूर्वी कशाप्रकारे मदत केली आहे, या संदर्भातील सर्व बाबींचा सांगोपाग विचार करून मदत देण्यात येईल. याबाबत दोन्ही उपमुख्यमंत्री, फलोत्पादन व कृषी मंत्री तसेच कोकणातील लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेण्यात येईल.
कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी बैठकीत सादरीकरण केले.तसेच कोकणातील लोकप्रतिनिधींनी आंबा व काजू नुकसानीची माहिती विषद करीत मदतीची मागणी केली. यावेळी कोकणातील लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment