Tuesday, 10 March 2026

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये दृक श्राव्य माध्यमांचा व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम · अर्ज करण्याची मुदत 22 मार्च 2026 पर्यंत

 पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये

दृक श्राव्य माध्यमांच व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम

·        अर्ज करण्याची मुदत 22 मार्च 2026 पर्यंत

 

            मुंबई दि. 9 : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या संलग्नतेने 1 एप्रिल 2026 पासून दृकश्राव्य माध्यमांचे अल्पमुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत. स्क्रीनराईटींगफिल्म डायरेक्शनबेसिक सिनेमॅटोग्राफीफिल्म एडिटिंगसाऊंड रेकॉर्डिंगव्हॉइस ओव्हर आर्टिस्टलाईव्ह साऊंड रेकॉर्डिंगअसिस्टंट कोरिओग्राफरफिल्म प्रॉडक्शन असिस्टंटइव्हेंट प्रॉडक्शन अँड मॅनेजमेंटफिल्म प्रॉडक्शन अँड मार्केटिंग असे एकूण 11 अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत.

            हे अभ्यासक्रम सैद्धांतिकप्रात्यक्षिक आणि कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारित असून प्रत्येक अभ्यासक्रम हा 3 महिने मुदतीचा असेल. माध्यम  तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गूगल फॉर्म द्वारे 22 मार्च 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच वरील 11 अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी व्याख्यात्यांची नियुक्ती करावयाची असल्यामुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक अध्यापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांकडूनही आपला व्यक्तिगत तपशील व अनुभवाच्या दाखल्यासहीत अर्ज मागविण्यात येत आहेत. दोन्हीसाठींचे अर्ज अकादमीच्या www.pldeshpandekalaacademy.org (अभ्यासक्रम) या संकेतस्थळावर गूगल  फॉर्मद्वारे 22 मार्च 2026 सायं. 5 वाजेपर्यंत मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप क्र.9819824954  वर संपर्क साधता येईल.

ठळक वैशिष्ट्ये

*  दृक श्राव्य माध्यमांतील तांत्रिक विषयांचे 11 अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

18,000 ते 52,500 रुपये इतक्या माफक शिक्षण शुल्कात आधुनिक काळाशी सुसंगत माध्यम शिक्षण घेण्याची संधी

*  थिअरी आणि प्रात्यक्षिके यांचा उत्तम समन्वय असलेले परिपूर्ण अभ्यासक्रम

दृकश्राव्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन

*  अद्ययावत उपकरणांवर प्रात्यक्षिके

*  प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी

*  दृक श्राव्य क्षेत्रात रोजगाराची संधी

*  दृक श्राव्य क्षेत्रासाठी प्रशिक्षित व प्रमाणित मनुष्यबळाची उपलब्धता

*  सहकारी बँकांमार्फत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे सहकार आयुक्तांचे बँकांना आदेश

*  पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि राज्य कौशल्य विकास मंडळाचे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र.

            राज्याच्या सांस्कृतिक कार्य  विभागातर्फे  प्रथमच पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत अशा प्रकारचा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असून माध्यम प्रशिक्षण अभ्यासक्रमांत प्राविण्य मिळवून टेलिव्हिजनवेबचित्रपट  तसेच एकूणच दृकश्राव्य माध्यमांत करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या सुसंधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi