Friday, 27 March 2026

सशक्ती कॉन्क्लेव्ह 2025-26’ चे मुंबईत उद्घाटन लर्निंग लिंक्स फाउंडेशन व मास्टरकार्डच्या सहकार्याने महिलांना डिजिटल सक्षमीकरणाचा मोठा आधार

 सशक्ती कॉन्क्लेव्ह 2025-26’ चे मुंबईत उद्घाटन

लर्निंग लिंक्स फाउंडेशन व मास्टरकार्डच्या सहकार्याने महिलांना

डिजिटल सक्षमीकरणाचा मोठा आधार

– मंत्री आदिती तटकरे

मुंबईदि. 26: लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्ड यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे महिलांना डिजिटल साक्षरताआर्थिक नियोजन आणि व्यवसाय उभारणीसाठी मोठा आधार मिळत असूनया माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक प्रभावीपणे होत असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

मुंबई येथे लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सशक्ती कॉन्क्लेव्ह 2025-26’ च्या उद्घाटनप्रसंगी तसेच भांडवल व अनुदान वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संघर्षशील आणि जिद्दी माता-भगिनींच्या प्रवासाचा प्रेरणादायी संवाद उलगडण्यात आला. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वय अधिकारी विजय ढोकेमास्टरकार्डचे उपाध्यक्ष श्री. हरीश बाबू एस.एन.वरिष्ठ व्यवस्थापक (कायदेशीर) श्री. सरथ चंद्रणलर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या ट्रस्टी ॲग्नेस नाथनवरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक अपूर्वा शिंदे तसेच विविध संस्थामाविम आणि सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi