Sunday, 15 March 2026

भारतातील सर्वात मोठ्या 10 गिगावॅट एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन

 प्रारंभी वारी एनर्जीज लिमिटेडच्या भारतातील सर्वात मोठ्या 10 गिगावॅट एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन प्रकल्पाच्या पायाउभारणीचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असलेली विशेष सोलर फोटोफ्रेम प्रकल्पाचे अध्यक्ष हितेशभाई दोशी यांनी प्रदान केली.

 

वारी एनर्जीजचे प्रमुख हितेशभाई दोशी यांनी स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात अकोला जिल्ह्यात वारी येथून प्रेरणा घेऊन या उद्योग समूहाची सुरुवात  केली असून या उद्योग समूहाद्वारे 25 देशात निर्यात होत आहे. तसेच 10 हजारपेक्षा जास्त प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून 93 हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती होत आहे. मुख्यमंत्री महोदय यांच्या पुढाकाराने अल्पावधीत प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात हजार 200 कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. भविष्यात 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून येत्या 18 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi