विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य;
गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावे
- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे
• अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 पूर्वतयारीसंदर्भात बैठक
मुंबई, दि. १६ : आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरळीत, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावे, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कामकाज करावे. विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येऊन गर्दी नियंत्रित व्हावी यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावे, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
विधानभवन, येथे 2026 च्या पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनाच्या अनुषंगाने पूर्वतयारीसंदर्भात बैठक सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अधिवेशन काळात सुव्यवस्था आणि सुरक्षितता याबाबत दक्षता घेण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीत सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, वाहनतळ व्यवस्था, अधिवेशन कालावधीतील अनुभवी डॉक्टरांची उपलब्धता, वैद्यकीय सुविधा, उपहारगृहामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा, उपहारगृहातील स्वच्छता व खाद्यपदार्थांची तपासणी, विधानभवन परिसरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, अखंडित पाणीपुरवठा, दूरध्वनी व इंटरनेट सुविधा, रेल्वे आरक्षण तसेच आपत्कालीन व्यवस्था या सर्व विषयांसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला
No comments:
Post a Comment