केवळ उद्योग उभारणे पुरेसे नाही, तर ते पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे. या प्रकल्पात 'सस्टेनेबल कास्टिंग' व 'रिसायकलिंग'वर भर देण्यात आला असून, राज्यात 'उद्योग व पर्यावरण' हातात हात घालून पुढे जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्योजकांनी राज्याचे दूत म्हणून काम करावे, असे आवाहन करत श्री. फडणवीस यांनी उद्योगांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, उद्योगांसाठी वीज दर पुढील पाच वर्षे स्थिर राहतील किंवा कमी होतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, औद्योगिक वसाहतींमध्ये गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. उद्योजकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
No comments:
Post a Comment