जबाबदार ‘एआय’ व जागतिक सहकार्यावर भर
- कृषी सल्लागार मॅरिऑन व्हॅन शाइक
महाराष्ट्र शासनाने २०२५-२०२९ या कालावधीसाठी ‘एआय इन अॅग्रिकल्चर धोरण’ जाहीर करून ही परिषद आयोजित केल्याबद्दल विशेष अभिनंदन करून या परिषदेत हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची मर्यादा, बदलती ग्राहक मागणी आणि मनुष्यबळाची कमतरता या पार्श्वभूमीवर एआय तंत्रज्ञानाची गरज असल्याचे नेदरलँड्सच्या कृषी सल्लागार मॅरिऑन व्हॅन शाइक यांनी सांगितले.
भारतीय कृषी क्षेत्रात सुमारे ४० टक्के महिला कार्यरत आहेत. एआयची अंमलबजावणी ही जबाबदार पद्धतीने व्हावी, ती शेतकऱ्यांची जागा घेण्यासाठी नव्हे तर त्यांना सक्षम करण्यासाठी असावी. तसेच शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि एआय अॅग्रीटेक कंपन्यांसाठी व्यवहार्य व्यवसाय मॉडेल व विश्वासार्ह डेटा पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या परिषदेत हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, मृदास्वास्थ्य जपणे, जैवविविधतेचे संरक्षण आणि अचूक शेती यांचा समतोल साधण्याचा दृष्टिकोन मांडण्यात आला. नेदरलँड्समध्ये ‘एआय’च्या अंमलबजावणीत पर्यावरणीय शाश्वततेवर भर दिला जातो. भारत आणि नेदरलँड्स यांच्यात लवकरच जाहीर होणाऱ्या धोरणात्मक भागीदारीमुळे कृषी नवकल्पनांसाठी नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment