सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रथमच बॅन्ड महोत्सवाचे आयोजन
- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार
· मुंबईतील वांद्रे येथील बँड येथे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान आयोजन
मुंबई दि. १३ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदा प्रथमच बँड महोत्सवाचे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान ॲम्फिथिएटर, बँड स्टॅन्ड वांद्रे पश्चिम, मुंबई या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे.
या बॅन्ड महोत्सवासाठी महाराष्ट्रातील विविध बॅन्ड पथक सहभागी होणार असून हा आगळावेगळा बॅन्ड महोत्सव प्रथमच शासनाच्या वतीने आयोजन करण्यात येत आहे.
मुंबई व पुणे पोलीस बॅन्ड पथकांनी देखील यामध्ये सहभाग घेतला आहे. १४ मार्च रोजी मुंबई पोलीस बॅन्ड, झंकार ब्रास बॅन्ड, किल्ले मच्छिंद्रगड सांगली, मास्टर रफी ब्रास बॅन्ड, जळगांव यांचे सादरीकरण होणार आहे तर रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ पुणे पोलीस बॅन्ड, पुणे, बाबुलाल ब्रास बॅन्ड, नासिक, जनता बॅन्ड पाटोदा, बीड, दर्यावर्दी ब्रास बॅन्ड, मुळेखंड कोळीवाडा, रायगड तर समारोपाच्या दिवशी सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६, पाईप बॅन्ड पुणे - (एसआरपी), वेस्ट बॅन्ड, मुंबई, अमर बॅन्ड, बारामती, पुणे या बॅन्ड पथकाचे सादरीकरण होणार आहे
No comments:
Post a Comment