रोहयो मंत्री भरत गोगावले म्हणाले की, २०२५ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १०५.८८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १०,५८३.६९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कोकण विभागात ९०,८०० हेक्टर क्षेत्र बाधित असून त्यापैकी २,११५ हेक्टर क्षेत्र आंबा पिकाखाली आहे. कोकणासाठी ८६.७६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार नाशवंत फळपिकांना हमीभाव लागू नसल्याने आंब्याला हमीभाव देणे शक्य नसल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment