Saturday, 10 January 2026

आरोग्य विभागाअंतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती करताना एसएचआरसीच्या मूल्यांकन अहवालानुसार कार्यवाही करावी.

 आरोग्य विभागाअंतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्यापदोन्नती करताना

एसएचआरसीच्या मूल्यांकन अहवालानुसार कार्यवाही करावी.

-         आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 10: सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदलीपदोन्नती करताना 'राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र(एसएचआरसी) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

केंद्र शासनाची 'राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (एनएचएसआरसीनवी दिल्लीही संस्था देश पातळीवर आरोग्य विभागास तांत्रिक सहकार्य करते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात 'राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र पुणेही संस्था कार्यरत आहे.  राज्याच्या आरोग्य विभागाची गुणवत्ता वाढआरोग्यविषयक संशोधन व तांत्रिक सहकार्य या संस्थेच्या वतीने देण्यात येते. आरोग्य विभागामार्फत एसएचआरसी  संस्था राज्यातील सर्व जिल्ह्यातील व महापालिका क्षेत्रातील आरोग्य संस्थांचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन करते. तसेच त्यांचे कामगिरीवर आधारित गुणवतेनुसार दरमहा (रँकिंग) गुणानुक्रम देत असते. या रँकिंग प्रणालीमध्ये प्रशासकीयतांत्रिक व वित्तीय बाबींचा समावेश असतो. यापुढे  सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीबढती करतानाकामगिरीवर आधारित मूल्यांकन (रँकिंग) प्रणालीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे आरोग्य सेवेचे कामकाज अधिक पारदर्शक होईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi