Saturday, 10 January 2026

राज्यातील आरोग्य कार्यक्रम राबवण्यासाठी केंद्र व राज्य शासना मार्फत निधी उपलब्ध होत असतो

 राज्यातील आरोग्य कार्यक्रम राबवण्यासाठी केंद्र व राज्य शासना मार्फत निधी उपलब्ध होत असतो. या निधीबरोबरच नागरिकांना आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबीलिटी (सीएसआर)' माध्यमातूनही निधी उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी  विभागाने  सीएसआर देणाऱ्या संस्थांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत असलेले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (डीपीएमव जिल्हा लेखा व्यवस्थापक (डीएएम), एनएचएम सल्लागार व एनएचएम कार्यक्रम अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यात. भेटीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. असे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले,

यावेळी पदभरतीमानव संसाधन सुसूत्रीकरणअधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या संस्थाच्या बाबतचे सादरीकरण करण्यात आले.

बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायकसचिव ई. रवींद्रनआरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेआरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकरसंचालक डॉ. विजय कंदेवाडसहसंचालक राजेंद्र भालेरावसह संचालिका डॉ. सुनीता गोल्हाईतसह संचलिका डॉ. सरिता हजारेमाजी महासंचालक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखेडॉ. मोहन जाधव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi