Wednesday, 7 January 2026

परिचर्या संचालनालयासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, नगरविकास विभागाची संयुक्त बैठक घेणार -

 परिचर्या संचालनालयासाठी आरोग्यवैद्यकीय शिक्षण,

नगरविकास विभागाची संयुक्त बैठक घेणार

-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

नागपूरदि. १२:-  परिचर्या संवर्ग हा आरोग्य सेवेचा आत्मा असून परिचर्या सेवा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. परिचर्या संचालनालय स्थापन करण्यासाठी आरोग्य विभागवैद्यकीय शिक्षण विभाग आणि नगरविकास विभाग यांची संयुक्त बैठक घेतली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली.

याबाबतची बैठक विधान परिषद सभापती यांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, अशी अपेक्षा सदस्य उमा खापरे यांनी व्यक्त केली. सभापती राम शिंदे यांनी ही बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेण्याचे आरोग्य विभागाला निर्देश दिले.

राज्यात परिचर्या संचालनालय स्थापन करणे या विषयी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

राज्यात ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्यशहरी भागात नगरविकास आणि वैद्यकीय  महाविद्यालयांच्या रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत रुग्णांना वैद्यकीय सेवा दिल्या जात आहे. त्यामुळे राज्यात परिचर्या संचालनालय स्थापन करणे याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी या विभागांची संयुक्त बैठक घेतली जाईलअसे आरोग्यमंत्री म्हणाले.

आरोग्य सेवेत परिचर्या सेवेला अधिक महत्व असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने परिचर्या संवर्गाबाबत स्वतंत्र बैठक घेतली असून या संवर्गासाठी स्वतंत्र संचालक देण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचेही मंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi