Saturday, 13 December 2025

दहिसर–जुहू येथील रडार स्थलांतराचा निर्णय; डीएन नगर परिसरातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

 दहिसरजुहू येथील रडार स्थलांतराचा निर्णय;

डीएन नगर परिसरातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूरदि. १३ : दहिसर आणि जुहू येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे निर्माण झालेल्या उंची मर्यादांचा अडथळा दूर करण्यासाठी राज्य शासनाने रडार केंद्रे स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीदहिसर आणि जुहू येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांच्या आजूबाजूच्या परिसरात इमारतींच्या उंचीवर बंधने येत असल्याने या भागातील पुनर्विकास रखडला होता. ही अडचण दूर करण्यासाठी रडार केंद्रे तांत्रिकदृष्ट्या योग्य अशा इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयतसेच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआययांनी दहिसर येथील रडार केंद्र गोराई येथे स्थलांतरित करण्यास सहमती दर्शवली आहे. यासाठी राज्य शासनाने स्थलांतराचा संपूर्ण खर्च उचलण्याची तसेच पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी केंद्र सरकारकडे दर्शवली आहे. गोरोई येथील जमीन भारत सरकारला मोफत हस्तांतरित करण्यात येणार असूनत्याबदल्यात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांच्या दहिसर येथील ५० टक्के जमिनीचा वापर सार्वजनिक उद्यानासाठी करणार आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi