Saturday, 13 December 2025

धनगर व बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत समिती गठित; तीन महिन्यात अहवाल अपेक्षित

 धनगर व बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत समिती गठित;

तीन महिन्यात अहवाल अपेक्षित

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

नागपूरदि.१३ : धनगर किंवा बंजारा समाजावर कोणताही अन्याय होऊ नयेही शासनाची ठाम भूमिका आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली असून ही समिती तीन महिन्यात अहवाल शासनास सादर करेलअशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य बबनराव लोणीकरअर्जुन खोतकरबाबासाहेब देशमुखसिद्धार्थ खरातहिरामण खोसकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शिरसाट बोलत होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi