Saturday, 13 December 2025

मुंबईतील संरक्षण क्षेत्रालगतच्या व फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी ‘हाउसिंग फॉर ऑल’ नवी योजना

 मुंबईतील संरक्षण क्षेत्रालगतच्या व फनेल झोनमधील

इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी हाउसिंग फॉर ऑल’ नवी योजना

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूरदि. 13 : संरक्षण क्षेत्रालगतच्या व फनेल झोनमधील मर्यादांमुळे पुनर्विकास रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास सुलभ करण्यासाठी राज्य शासनाने हाउसिंग फॉर ऑल’ ही नवी योजना आणल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमुंबईतील अनेक भागांमध्ये संरक्षण क्षेत्रालगतची जमीनफनेल झोन तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे पूर्ण क्षमतेने पुनर्विकास करणे शक्य होत नव्हते. ही अडचण दूर करण्यासाठी हाउसिंग फॉर ऑल’ ही नवी योजना तयार करण्यात आली असूनया माध्यमातून मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्युएस३०० चौरस फुटांपर्यंतचा एफएसआय विनामूल्य देण्यात येणार आहे. तसेच कमकुवत घटकांसाठी ६०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांची पुनर्बांधणी विनाशुल्क व्हावीअशी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेला इन्सेंटिव्ह एफएसआय देय राहणार असून मूळ जमीनमालकांचा बेसिक एफएसआयचा हक्क अबाधित ठेवण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi