Wednesday, 12 November 2025

चॅटजीपीटी या साधनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविले. त्यांनी सांगितले की, फोटो

 किशोर जस्मानी यांनी चॅटजीपीटी या साधनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविले. त्यांनी सांगितले कीफोटो आणि योग्य प्रॉम्प्ट दिल्यानंतर चॅटजीपीटी त्या आधारे वृत्तपत्रीय बातमी तयार करून देते. मात्र यासाठी योग्य प्रॉम्प्ट देणे अत्यावश्यक आहे.

त्याचप्रमाणे चॅटजीपीटीवर आवाज रेकॉर्ड करून हवे त्या भाषेत लेखन करून घेता येतेतसेच व्हॉईस डिक्टेटद्वारेही हे टूल्स पत्रकारांना सहाय्य करते. या प्रक्रियेतून त्यांनी प्रॉम्प्टडिक्टेट आणि डिस्कशन अशा तीन प्रकारची प्रात्यक्षिके करून दाखविली.

‘एआय’ टूल्स हस्तलिखित प्रतीवरून स्वयंचलितपणे टंकलेखन करू शकतात. पीडीएफ स्वरूपातील मजकूर चॅटजीपीटीच्या मदतीने कसा उपयोगात आणता येऊ शकतोयाचे सविस्तर मार्गदर्शनही त्यांनी केले.

या प्रशिक्षण सत्रात उपस्थित पत्रकारांनी ‘एआय’ साधनांचा वापर करून प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे सराव केला आणि संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन घेतले.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi