कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
· ३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य
मुंबई, दि. ११ : राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच 'शाश्वत शेती - समृद्ध शेतकरी' या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले. तसेच बोधचिन्ह स्पर्धेतील विजेता आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश कुमार, कृषी आयुक्त सूरज मांढरे, उपसचिव प्रफुल्ल ठाकूर, संचालक रफिक नाईकवाडी, कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment