उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्प जोडरस्त्याने वाढवणपर्यंत विस्तारास मान्यता
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंग रोडला मान्यता,
· पुरंदर विमानतळ येथे जाण्यासाठी मेट्रो आणि रस्तामार्ग, पार्कीगची मोठ्या प्रमाणात सुविधा
मुंबई, दि. 4 : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस.व्ही.रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरिमन पाईंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येत आहे. याचबरोबर उत्तर दक्षिण जोडणी करत 24.35 कि.मी.चा उत्तन-विरार सागरी सेतू बांधण्यात येणार असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेशकुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment