Monday, 6 October 2025

पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे प्रा

 पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे

प्राधान्याने पूर्ण करावीत

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

       मुंबईदि.४ : 'णमोकार तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे. फेब्रुवारी महिन्यात होणा-या 'पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्याच्याअनुषंगाने तात्काळ व दीर्घ कालावधीत होणा-या कामांचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मौजे मालसाने येथील जैन समाजाच्या 'णमोकार तीर्थक्षेत्र', येथे 'पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळाआयोजनासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारअन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळजलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेआमदार राहुल आहेरउत्सव समिती सदस्य संतोष पेंढारीजैन अल्पसंख्याक वित्त मंडळाचे अध्यक्ष ललीत गांधीनाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडामजिल्हाधिकारी जलज शर्मा उपस्थित होते. 

                  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'णमोकार तीर्थधर्मस्थळाचे मोठे महत्व आहे. 'पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठी  मोठया संख्येने भाविक येथे येतात.   हे लक्षात घेता  भाविकांसाठी रस्तेतात्पुरते निवासपार्किंगसह इतर तात्काळ  करावी लागणारी कामे प्राधान्याने करावीत.  स्थायी कामांमध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने जी कामे करता येतील ती देखील करावी. दीर्घ कालावधीत करता येणा-या कामांचा प्रस्ताव शासनाला सादर करावाजेणेकरून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून ही कामे करता येतीलविकास आराखड्यातील स्थायी व अस्थायी कामांची यादी प्राधान्यक्रम घेऊन तयार करावी. विभागीय आयुक्त आणि स्थानिक प्रशासन व 'पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळा आयोजन समितीने याबाबतीत कामांच्या यादीचा  सुधारित प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

यावेळी आमदार राहुल आहेर व जैन अल्पसंख्याक वित्त मंडळाचे अध्यक्ष ललीत गांधी यांच्यासह महोत्सव समितीच्या सदस्यांनी महोत्सवाचे तसेच मंदिर परिसर विकासासाठीचे सादरीकरण केले.                                        0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi