Friday, 3 October 2025

या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखावा

 या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करताना दर्जा,

 सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखावा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

बीडच्या कंकालेश्वर मंदिरासह औंधचे संग्रहालय

राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा

 

मुंबईदि. 1 :- बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असूनते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीतअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये तसेच या स्मारकांच्या परिसरातील एकही झाड तोडले जाणार नाहीयाची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी होते. बैठकीत कंकालेश्वर मंदिरबीड व श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालयऔंध (जि. सातारा) या राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन-दुरुस्तीच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णीउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखपुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गेसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजेदूरदृश्य्‍ाप्रणालीद्वारे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनपुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi