मेट्रो लाईन-३ (अॅक्वा लाईन) च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीत क्रांती घडवणाऱ्या ३३.५ कि.मी. लांबीच्या पूर्ण भूमिगत मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे आचार्य अत्रे चौक–कफ परेड मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावेळी लोकार्पण केले जाणार आहे.
एकूण २७ स्थानके असलेली ही लाईन दररोज १३ लाख प्रवाशांना सेवा देईल. दर पाच मिनिटांनी धावणाऱ्या आठ डब्यांच्या गाड्या प्रति तास ७२,००० प्रवासी वाहून नेतील. सायन्स सेंटर ते कफ परेड असा १०.९९ कि.मी.चा टप्पा ₹१२,१९५ कोटी खर्चून बांधण्यात आला असून, हा मार्ग मंत्रालय, उच्च न्यायालय, आरबीआय, शेअर मार्केट, मरीन ड्राइव्हसारख्या आर्थिक व सांस्कृतिक ठिकाणांना जोडला जाणार आहे.
मुंबई मेट्रो लाईन ३ हा एकूण ₹ ३७,२७६ कोटी खर्चाचा प्रकल्प केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, जेआयसीए आणि एमएमआरसीएल यांच्या संयुक्त भागीदारीत राबविला गेला आहे. मुंबईकरांना जागतिक दर्जाची, हरित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक प्रणाली देण्याच्या दिशेने हा निर्णायक टप्पा आहे.
No comments:
Post a Comment