Tuesday, 7 October 2025

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात नवे युग सुरू करणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प ठरणार आहे. सिडको  प्राधिकरण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या माध्यमातून हा विमानतळ सार्वजनिक-खागी भागीदारी (PPP) अंतर्गत उभारण्यात आला आहे. या विमानतळाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री मोदी हे विमानतळावरील सोयी सुविधांची पाहणी करणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात ₹१९,६४७ कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारलेला हा विमानतळ दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी व ०.५ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळू शकतो. अंतिम टप्प्यात हे विमानतळ ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२५ दशलक्ष टन मालवाहतूक क्षमतेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनेल.

दोन समांतर कोड-एफ रनवेजलद बाहेर पडण्यासाठी टॅक्सीवेअत्याधुनिक मालवाहतूक  टर्मिनलसौरऊर्जेवर आधारित ४७ मेगावॅटचा ऊर्जेचा पुरवठा आणि इलेक्ट्रिक बस सेवा ही या विमानतळाची वैशिष्ट्ये आहेत. तसेचहा देशातील पहिला वॉटर टॅक्सीने जोडलेला विमानतळ असणार आहे.

या विमानतळावरुन डिसेंबर २०२५ मध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार असूननवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या आधुनिकहरित आणि जागतिक दर्जाच्या विमान वाहतूक पायाभूत सुविधेचे प्रतिक ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi