Monday, 6 October 2025

झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार

 झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास 

शासन सहकार्य करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पहिल्या झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025’ चे उद्घाटन

 

मुंबईदि. 6 - अनेक दशकांचा वारसा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा असलेल्या झवेरी बाजार परिसराला रत्न आणि आभूषण उत्सवामुळे सध्या नवे रूप आले आहे. या बाजार परिसराची पुनर्रचना आणि सुशोभीकरण करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनने पुढाकार घ्यावाराज्य शासनाच्या यंत्रणा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करतीलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईच्या ऐतिहासिक दागिने बाजाराचे वैभवपरंपरा आणि आर्थिक महत्त्व पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रथमच 'झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिव्हल 2025चे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव 22 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला असून 6 ते 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान चालणाऱ्या मुख्य प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झवेरी बाजार परिसरात झाले. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाझवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष हितेश जैनसचिव किशोर जैन यांच्यासह ज्वेलरी क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi