Sunday, 5 October 2025

विकसित भारतासाठी महिला व बालकांचा सर्वांगीण विकास राज्यांच्या समन्वयाने शक्य

 विकसित भारतासाठी महिला व बालकांचा सर्वांगीण विकास

राज्यांच्या समन्वयाने शक्य

-  केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी

कुपोषण निर्मूलन व महिलांच्या सुरक्षेसाठी अंगणवाडी व योजनांच्या बळकटीकरणाची

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी

 

मुंबई दि. 4 : विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावीयासाठी केंद्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेलअसे प्रतिपादन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केले.

महाराष्ट्रात मिशन वात्सल्य व मिशन शक्ती या योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी केंद्र शासनाकडून समन्वय होणे आवश्यक आहे. राज्य कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविणे अत्यावश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी विविध राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे मंत्री दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

विकसित भारताच्या दृष्टीने महिला व बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासंदर्भात तसेच  योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी स्पष्ट मानव संसाधन धोरणपुरेश्या पायाभूत सुविधाआर्थिक समतोलन्याय्य वेतनविश्वसनीय स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आणि अनुदान यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी बालविवाहहुंडा प्रथाघरगुती हिंसा व लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी राज्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिलीतसेच नवीन शिक्षण धोरणांतर्गत पढाई भीपोषण भी योजना प्रभावीपणे राबविली जात असल्याचे स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi