Facebook : https://www.facebook.com/
YouTube : https://www.youtube.com/
राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या ‘सर्वांसाठी विकास’ या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, मुक्त व निवासी विद्यालये, तसेच व्यावसायिक प्रशिक्षण व रोजगार क्षमतेसाठी विशेष प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगाराच्या योजना तर युवकांसाठी ‘कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविले जात आहेत. त्याचबरोबर, अल्पसंख्याक समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्याजमुक्त कर्ज योजना, भांडवली अनुदान योजना, आणि व्यवसाय मार्गदर्शन उपक्रम सुरू आहेत. या योजना यांची अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती सचिव श्री. जयवंशी यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात दिली आहे.
No comments:
Post a Comment