प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'प्रधानमंत्री धन–धान्य कृषी' योजनेचा शुभारंभ
केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न भरणे
पुणे, दि. ११: 'प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने'चा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, पुसा, नवी दिल्ली येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे झाला. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत राज्यातील ९ जिल्ह्यांची निवड झाली असून केंद्राच्या व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने'च्या दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषीमंत्री श्री. भरणे बोलत होते.
No comments:
Post a Comment