Saturday, 4 October 2025

मच्छीमारांना सूचना : समुद्रात जाणे टाळा

 मच्छीमारांना सूचना : समुद्रात जाणे टाळा

भारतीय हवामान विभागाने सर्व मच्छीमारमच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना कडक सूचना दिल्या आहेत कीपुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. वादळी वारे आणि उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहीलअसा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

            मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व किनारी जिल्हा प्रशासनांना निर्देश दिले आहेत कीया सूचनेची माहिती सर्व मच्छीमार आणि किनारी गावांतील नागरिकांपर्यंत त्वरीत पोहोचवावी. सागरी सुरक्षितता आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi