विदर्भ, तापी खोरे विकास महामंडळा अंतर्गत मान्यता मिळालेल्या
सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा
- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
नियामक मंडळाच्या बैठकीत विविध विषयांना मान्यता
मुंबई, दि.१५ :- वरखेडे लोंढे मध्यम सिंचन प्रकल्पाचे काम वेगात पूर्ण झाले असून त्या पद्धतीने विदर्भ, तापी खोरे विकास महामंडळा अंतर्गत मान्यता मिळालेल्या सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
मंत्रालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या आणि तापी पाटबंधारे महामंडळाच्या विविध कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत बोरकर यासह विविध क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विविध सिंचन प्रकल्पातील कामांचा मंत्री महाजन यांनी आढावा घेतला.
मंत्री महाजन म्हणाले, नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या कामांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार असल्याने ही कामे गतीने व निर्धारित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment