‘मोदीज मिशन’ पुस्तकातून राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासाचे दर्शन
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाची जी पायाभरणी केली आहे, ती अवर्णनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "मोदीज मिशन" या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या पुस्तकात प्रधानमंत्री मोदी यांच्या जीवनाचा केवळ आढावा घेतलेला नाही, तर एका व्यक्तीच्या मूल्यांची, जाणीवेची आणि राष्ट्रासाठी झटण्याच्या वृत्तीची निर्मिती कशी होते, हे दाखवले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेवा आणि संन्यास या दोन्ही मार्गांचा अनुभव घेतल्यानंतर, संघकार्याद्वारे राष्ट्रभावना जागृत करण्याचा संकल्प केला.
त्यांच्या नेतृत्वाखाली देशात 370 कलम रद्द करणे, राम मंदिर उभारणी, नागरिकत्व कायदा किंवा तिहेरी तलाक बंदी यांसारख्या ऐतिहासिक निर्णयांचा साक्षीदार झाला आहे. या सर्व निर्णयांच्या मागे राष्ट्रचेतनेची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी न्यायव्यवस्थेचा सन्मान राखला आणि संस्थांना अधिक मजबूत केले. सरकार आणि न्यायसंस्था यांच्यातील संतुलन राखत त्यांनी लोकशाही संस्थांवरील विश्वास अधिक दृढ केला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले.
अर्थव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून भारताने जगातील विकसित अर्थव्यवस्थांनाही मागे टाकले आहे. नोटबंदी, जीएसटी आणि आयकर सुधारणा यांसारख्या उपाययोजनांनी करपालन संस्कृती रुजवली. पूर्वी कर टाळणे ‘पुरुषार्थ’ मानणाऱ्या समाजात आता करपालन ही नवी मूल्यव्यवस्था तयार झाली आहे.
No comments:
Post a Comment