अर्थव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून भारताने जगातील विकसित अर्थव्यवस्थांनाही मागे टाकले आहे. नोटबंदी, जीएसटी आणि आयकर सुधारणा यांसारख्या उपाययोजनांनी करपालन संस्कृती रुजवली. पूर्वी कर टाळणे ‘पुरुषार्थ’ मानणाऱ्या समाजात आता करपालन ही नवी मूल्यव्यवस्था तयार झाली आहे.
प्रधानमंत्री मोदी यांनी समाजातील गरीब, शेतकरी, युवा आणि महिला हेच भारताच्या आकांक्षांचे केंद्र मानले. या चार घटकांच्या उन्नतीतच विकसित भारताचा पाया असून ‘मोदीज मिशन’ पुस्तक भारताच्या विकासगाथेचा आरसा आहे असेही श्री.फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment