कडधान्य हे आपल्या आहारातील प्रथिनाचे मुख्य साधन असून आपल्या देशात अजूनही कडधान्याची कमतरता आहे. चना, मूग, तूर, उडीद, मसूर यांचे उत्पादन वाढविण्यात येणार असून भारत आत्मनिर्भर बनणार आहे. कडधान्याच्या शेतीसाठी खतांचा वापर कमी होत असल्यामुळे नैसर्गिक शेती आणि कडधान्य शेती एकमेकांना पूरक बाबी असल्याने त्याचा जमीनीचा पोत वाढण्यासाठी फायदा होतो. शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करा, सेंद्रीय खताचा वापर करावा.
शासनाच्या योजनांचा लाभ घ्या, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा आणि आपल्या शेतीला नवसंजीवनी द्यावी, असे आवाहन करतानाच शेतीसाठी सर्वांनी मिळून एकत्र काम केल्यास महाराष्ट्र राज्य शेतीमध्ये अग्रेसर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment