Wednesday, 15 October 2025

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे स्थान वैशिष्ट्ये

 एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची माहिती दिली.  झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी आभार व्यक्त केले.

प्रकल्पाचे स्थान व परिसराची वैशिष्ट्ये

पूर्व द्रुतगती महामार्गास लागून असलेला हा परिसर विमानतळउपनगरी रेल्वे स्थानक व प्रमुख रस्ते मार्गांशी उत्तमरित्या जोडलेला आहे. हा प्रकल्प घाटकोपर रेल्वे स्थानकापासून 2.5 किमीमुंबई विमानतळापासून 4.8 किमीवांद्रेवरळी सागरी सेतूपासून 12 किमी आणि शिवडीन्हावा शेवा अटल सेतूपासून 9.5 किमी अंतरावर आहे. तसेच पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पाचा विस्तारित भाग या परिसरातून जात आहेज्यामुळे वाहतुकीची जोडणी अधिक सक्षम होणार आहे.

पुनर्वसन योजनेची ठळक वैशिष्ट्ये

• प्रकल्प क्षेत्र : 31.82 हेक्टरअंदाजे 17,000 झोपडीधारकांचा समावेश

• एकूण 17,000 झोपडीधारकांपैकी 10,000 झोपडीधारकांची पात्रता निश्चित करून जवळपास सर्व पात्र  झोपडीधारकांशी वैयक्तिक विकास करारनामे करण्यात आले आहेत.

• प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे 36 महिन्यांचा कालावधी अपेक्षित.

• 31.82 हेक्टर वसाहतीमध्ये पक्के रस्तेरस्त्यावरील दिवेपर्जन्यजल निचरा व्यवस्थाखेळाची मैदानेप्राथमिक शाळाधार्मिक आणि सामाजिक स्थळे विकसित करण्यात येणार आहेत.

• इमारतीला अधिकृत ताबा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील 10 वर्षे त्या इमारतीची देखभाल कंत्राटदाराकडून करण्यात येईल.

• हा प्रकल्प केवळ गृहनिर्माणापुरता मर्यादित नसून एक वाणिज्यिक केंद्र म्हणून उभा राहणार आहे.

• या वाणिज्यिक केंद्रामुळे स्थानिकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळतील आणि महिला सबलीकरणाचा मार्ग खुलेल.

पुनर्वसन सदनिकांची वैशिष्ट्ये

• पात्र झोपडीधारकांना एक बेडरूमहॉल व किचन स्वरूपाची300 चौरस फूट चटई क्षेत्र असलेली घरे विनामूल्य देण्यात येतील.

• इमारतींच्या सर्व खोल्यांमध्ये 600x600 मिमी आकाराच्या विट्रिफाईड टाईल्स आणि स्वयंपाकघरात 600x600 मिमी मॅट फिनिश सिरॅमिक टाईल्स वापरल्या जातील.

• स्वयंपाकघरात ग्रॅनाइट प्लॅटफॉर्मसह स्टेनलेस स्टील सिंकची सुविधा असेल.

• बाथरूममध्ये लिंटल उंचीपर्यंतच्या भिंतींवर 300x300 मिमी मॅट फिनिश सिरॅमिक टाईल्सतसेच तळमजल्यावरील फ्लोअरिंगसाठी समान दर्जाचे टाईल्स वापरले जातील.

• खिडक्यांना अ‍ॅनोडाईज्ड सेक्शन्समुख्य व शयनकक्ष दरवाज्यांना लाकडी फ्रेम्सतर शौचालयांना संगमरवरी फ्रेम्स.

• तळमजल्यावरील लॉबीमध्ये मार्बल फ्लोअरिंग.

• प्रत्येक इमारतीमध्ये प्रवासी तसेच स्ट्रेचर लिफ्ट्सची सुविधा.

• जलशुद्धीकरणसांडपाणी प्रक्रिया आणि सेंद्रिय कचरा रूपांतरण यंत्रणा बसविण्यात येणार.

• संपूर्ण परिसरासाठी एकात्मिक पायाभूत सुविधा आराखडा तयार करून उच्च दर्जाच्या नागरी सुविधांची व्यवस्था केली जाईल.

• सौर पॅनेल्स आणि पर्जन्यजल संधारण सुविधा देण्यात येईल.

वसाहतीतील सोयीसुविधा व सवलती

• अत्याधुनिक भूकंपप्रतिरोधक तंत्रज्ञानाचा वापर

• मुबलक सूर्यप्रकाश व नैसर्गिक वायुवीजन सुनिश्चित करणारी रचना

• पार्किंगची पुरेशी सुविधा

• बागबगीचेमनोरंजनाचे मैदानअंगणवाडीस्वास्थ्य केंद्रसमाजमंदिरव्यायामशाळायुवा केंद्रवाचनालयसोसायटी ऑफिस इत्यादी आधुनिक सुविधा

• ज्यांच्याकडे दुकाने आहेतत्यांना व्यावसायिक युनिट्स प्रदान करण्यात येतीलज्यामुळे स्थानिक व्यवसायांना प्रगतीची संधी मिळेल.

पहिला टप्पा – पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी

• पहिल्या टप्प्यात 4345 झोपडीधारकांचे पुनर्वसन प्रस्तावित.

• झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करून परिशिष्ट2 प्रसिद्ध केले आहे.

• सर्व पात्र झोपडीधारकांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे — ₹137.50 कोटी इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे.

• पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा अंदाजित खर्च ₹1,299 कोटी (GST वगळून).

• योजना पूर्ण करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी अपेक्षित.

• प्रकल्पांतर्गत सुमारे 4,345 पुनर्वसन सदनिकांच्या बांधकामासाठी (सोयी सुविधांसहित) कंत्राटदार नेमण्यात आला असूनभूमिपूजन होताच बांधकामास सुरुवात होणार.

20232025 दरम्यान या पुनर्विकास प्रकल्पाबाबत MMRDA ने पूर्ण केलेली कामे.

• सप्टेंबर 2023 मध्ये MMRDA आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संयुक्त भागीदारी तत्वावर हा प्रकल्प सुरू केला.

• या योजनेसाठी वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नेमणूक 6 ऑगस्ट 2024 रोजीच्या कार्यादेशाद्वारे करण्यात आली.

• 3 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते झोपडीधारकांना भाडे देण्यासाठी धनादेश वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.

• सप्टेंबर 2023 ते 2025 या कालावधीत MMRDA ने महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक मंजुरी प्राप्त करून सरकारी भुखंड ताब्यात घेतले.

• झोपडीधारकांशी वैयक्तिक विकास करारनामे करण्यात आले आणि एकूण 3,662 झोपड्या निष्कासित करून संपूर्ण भूखंड रिकामा करण्यात आला.

• टप्पा1 मधील पुनर्वसन इमारतींसाठी निविदा प्रक्रिया 30 सप्टेंबर 2025 रोजी पूर्ण झाली असूनलघुत्तम निविदाकारास देकारपत्र देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi