Wednesday, 22 October 2025

आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

 आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या

निधी वितरणाला मान्यता

-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबईदि. २१:  यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी मान्यता दिली असून आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपर्यंत मदत व पुनर्वसन विभागाकडून यंदाच्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे ८१३९ कोटी रुपये इतक्या रकमेचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेतअशी माहितीही मंत्री श्री. जाधव पाटील यांनी यावेळी दिली.

मंत्री श्री. पाटील म्हणालेराज्य शासनाने  घेतलेल्या या  निर्णयामुळे राज्यातील सहा लाख ५६ हजार ३१०.८३ हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख १२ हजार १७७ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.  यापूर्वी या शेतकऱ्यांना दोन  हेक्टर पर्यंत मदत मंजूर करण्यात आली होतीतर आता अतिरिक्त एक हेक्टरसाठी ही वाढीव मदत देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा आधार दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी व्यक्त केला छत्रपती संभाजीनगर विभाग- बीडलातूरपरभणीछत्रपती संभाजीनगरजालनाहिंगोलीनांदेड या जिल्ह्यातील तीन लाख ५८ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या तीन लाख ८८ हजार १०१.१३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ३४६ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi