Tuesday, 21 October 2025

दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुलाखत

 दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मित्रा’ चे

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुलाखत

 

मुंबईदि. 20: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 24, शनिवार दि.25, सोमवार दि. 27 आणि मंगळवार 28 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ या मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. तसेच जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुजे यांनी घेतली आहे.

 

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

राज्याच्या जलद आणि व्यापक विकासासाठीखासगी क्षेत्र आणि गैर-सरकारी संस्थांच्या सहभागाद्वारे प्रभावी धोरणात्मक आणि तांत्रिक दिशा देण्यासाठी शासनाने ‘मित्रा’ या राज्यस्तरीय थिंक टँकची स्थापना केली आहे. ही संस्था नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यातील सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून राज्याच्या विकास प्रक्रियेला धोरणात्मकतांत्रिक आणि कार्यात्मक दिशा प्रदान करते. राज्य शासनाच्या विविध विभागांना उद्दिष्टे साध्य करण्यात सक्षम करण्याबरोबरचया संस्थेचे लक्ष कृषी व संलग्न क्षेत्रआरोग्य व पोषणशिक्षणकौशल्य विकास व नवोन्मेषशहरीकरण व बांधकाम क्षेत्र विकासवित्तपर्यटनक्रीडाऊर्जा संक्रमण व हवामान बदलउद्योग व लघुउद्योगपायाभूत सुविधामाहिती तंत्रज्ञानपूरक सेवा व दळणवळण अशा १० प्रमुख क्षेत्रांवर केंद्रित आहे. याशिवाय पर्यावरणवन व वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही विशेष भर दिला जात आहे. त्याअनुषंगाने जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलासकार्यक्रमात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांनी संस्थेचे उपक्रमसहभाग आणि राज्याच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व कार्यपद्धतीचा करण्यात येणारा अवलंबयाविषयी माहिती दिली आहे.

0000

जयश्री कोल्हे/स.सं


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi