Sunday, 19 October 2025

बहुजन समाजाचे कैवारी आणि उत्तम प्रशासक

 बहुजन समाजाचे कैवारी आणि उत्तम प्रशासक

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रवी नाईक यांना बहुजन समाजाचे कैवारी संबोधले. ते म्हणाले की, "सर्व समाजाला एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न सदैव स्मरणात राहणार आहे. कुळ-मुंडकार असो किंवा कृषी क्षेत्रत्यांचे योगदान मोठे आहे. राज्यातील तरुणांसाठी ते एक प्रेरणास्थान होते. त्यांनी अनेक खात्यांचा कारभार करत असताना सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य दिले. विविध क्षेत्रात केलेला विकास हा कायम सर्वांच्या लक्षात राहणार आहे. 

तपोभूमी रवींमुळेच साकारली अशा शब्दात कुंडई येथील तपोभूमीचे श्री ब्रह्मेशानंद महाराज यांनी रवी नाईक यांच्या योगदानाची आठवण करून दिली.उद्योजक अवधूत तिंबलो यांनी रवी नाईक यांच्यातील व्यक्ती आणि नेतृत्वाच्या खास गुणांचे यावेळी स्मरण केले.भाऊसाहेब बांदोडकरशशिकला काकोडकर यांसारख्या नेत्यांच्या पंक्तीत रवी नाईक यांचे नाव असल्याचे सांगून वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी भावना व्यक्त केल्या.भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर रवी नाईक हेच खऱ्या अर्थान बहुजन समाजाचे नेते असल्याचे सांगून अॅड. रमाकांत खलप यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकखासदार सदानंद तानवडेसभापती गणेश गावकरआरोग्यमंत्री विश्वजीत राणेदामू नाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi