जल, ऊर्जा आणि हवामानबदल विषयक कृतींना
जोडून शाश्वत विकासाकडे वाटचाल
मुंबई, दि. १६ : हवामान बदलासंदर्भातील उपाययोजना आणि कृती संदर्भातील कार्यवाही राज्य अधिक वेगाने राबवत आहे. याचबरोबर, स्थानिक पातळीवर निसर्गावर आधारित उपायांना प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी वित्तपुरवठा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देणे या विषयांवरही मुंबईत झालेल्या पत्र सूचना कार्यालय (PIB) आणि युनिसेफ यांच्या संयुक्त परिसंवादात चर्चा झाली.
पर्यावरण विषयक जनजागृती आणि संवाद अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, पत्र सूचना कार्यालय आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत माध्यमांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत सामूहिक हवामान बदल प्रयत्न, युवकांचा सहभाग आणि शाश्वत जल-ऊर्जा प्रारूपांचा महाराष्ट्रात वापर करण्यावर भर देण्यात आला .
जलसुरक्षा, ऊर्जा संक्रमण आणि सामूहिक सहभाग या एकात्मिक दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य हवामान बदलाशी सुसंगत विकासाचे आघाडीचे उदाहरण ठरत आहे. राज्यातील सुमारे ९० टक्के ग्रामीण लोकसंख्या भूजलावर अवलंबून असून, बहुतेक भाग खडकाळ किंवा पर्जन्यछायेचा आहे. त्यामुळे हवामान बदलाशी सुसंगत कृती राबविण्याची अत्यंत गरज निर्माण झाली असल्याची चर्चाही परिसंवादात करण्यात आली.
पत्र सूचना कार्यालयाच्या (पश्चिम विभाग) महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी प्रसारमाध्यमांच्या भूमिकेबाबत सांगितले की, माध्यमे नागरिकांमध्ये केवळ जागरूकता निर्माण करत नाहीत, तर पर्यावरण विषयक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि लोकसहभाग वाढविण्यास मदत करतात.
No comments:
Post a Comment