Friday, 17 October 2025

रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे सप्टेंबरचे मानधन वितरित

 रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे

 सप्टेंबरचे मानधन वितरित

 

मुंबईदि. 17 : रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक यांना मानधन ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे. तसेच सप्टेंबर 2025 चे मानधन 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत संबंधित आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

राज्यस्तरावरून केंद्र शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे केंद्र शासन

मानधन तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईलअसेही रायगड जिल्हा आरोग्य अधिकारीरायगड

जिल्हा परिषदअलिबाग यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi