युवा आशियाई कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक विजेती
सेरेना म्हसकरचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव
मुंबई दि. २९ : तिसऱ्या युवा आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भारतीय संघातील सेरेना सचिन म्हसकर हिचा विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार (मुंबई उपनगर) यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी कटियार यांनी भविष्यात सेरेनाला तिच्या क्रीडा जीवनासाठी आवश्यक ती सर्व मदत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
सेरेनासोबत तिचे प्रशिक्षक अमित ताम्हणकर, आई श्रीमती मेघाली म्हसकर (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त) आणि वडील सचिन म्हसकर (आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू) उपस्थित होते.
No comments:
Post a Comment