Sunday, 12 October 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक आणि सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

 आर्थिक आणि सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल

- सरन्यायाधीश भूषण गवई

मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

 

रत्नागिरीदि.12 (जिमाका) : मंडणगड येथे झालेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेलया दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील रहाल. जेणेकरुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आणि आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईलअशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली.

मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपालकमंत्री डॉ. उदय सामंतउच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिकपालक न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदारराज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. पी. तावडेमहसूल राज्यमंत्री योगेश कदमप्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधवदिवाणी  न्यायाधीश (क.स्तर) अमृता जोशीबार असोसिएशनचे अध्यक्ष अमोल सावंतसदस्य संग्राम देसाईवकील संघाचे अध्यक्ष मिलींद लोखंडेआमदार किरण सामंतविभागीय आयुक्त विजय सूर्यवंशीविशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडेजिल्हाधिकारी मनुज जिंदल आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi