Sunday, 28 September 2025

सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 

ठाणे, दि. २५ (जिमाका) :- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सानपाडा येथील नूतन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी वन मंत्री गणेश नाईकपणन मंत्री जयकुमार रावलसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेआमदार निरंजन डावखरेमंदा म्हात्रेप्रशांत ठाकूरविक्रांत पाटीलप्रशांत ठाकूरकुमार अयलानीमाजी खासदार संजीव नाईकमहाराष्ट्र गृह निर्माण व कल्याण महामंडळ (मर्या.) मुंबईच्या व्यवसायिक संचालक तथा पोलीस महासंचालक अर्चना त्यागीनवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेपोलीस सहआयुक्त संजय एन. पुरेअतिरिक्त पोलीस आयुक्त (नवी मुंबई) दीपक चाकोरेअतिरिक्त पोलीस आयुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

नूतन इमारतीची पोलीस प्रशासन तसेच नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सेवा-सुविधायुक्त उभारणी करण्यात आली आहे. तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ई-संवाद कक्षवायफाय कक्षअधिकारी कक्षलिपिक कक्षशस्त्रागार कक्षगुन्हे अन्वेषण कक्षपोलीस कोठडीतडीपार गुन्हेगार कक्षअभिलेख कक्ष व मुद्देमाल कक्ष असे विविध कक्ष उभारण्यात आले आहेत. या सुविधांमुळे कामकाज अधिक गतिमान होणार असून नागरिकांशी संवाद अधिक प्रभावी होईल.

पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन

या कार्यक्रमावेळी वाशी पोलीस ठाणेपनवेल तालुका पोलीस ठाणे व सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे यांना ISO 9001 : 2015 या मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे प्रमाणपत्र गुणवत्ताकार्यक्षमता व पारदर्शकता सुनिश्चित करणारे असल्याने पोलीस विभागाच्या कामकाजाची विश्वासार्हता वाढणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नूतन इमारतीच्या माध्यमातून नवी मुंबई पोलीस दलाला मिळणाऱ्या सुविधा व नागरिकांच्या सुरक्षेसाठी होणाऱ्या सकारात्मक बदलांबद्दल समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi