राज्यातील 75 गावे ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्याचे नियोजन करावे
- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार
· सेवा पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
मुंबई, दि. 9 : राज्यात सेवा पंधरवड्यानिमित्ताने अत्याधुनिक तंत्रज्ञान, वेगवान इंटरनेट सेवा, वायफाय व विविध कार्यप्रणालीत कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर याद्वारे राज्यातील 75 गावे ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.
राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येत असून माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाने @75 ही संकल्पना घेऊन विविध लोकाभिमुख उपक्रम राबवावे, असे निर्देशही माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिले.
माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन - नैनुटिया, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती म्हसे-पाटील तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment